लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील समगा येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील पूल कोसळल्याने पुढील मार्ग पूर्णत: बंद झालेला आहे. या ठिकाणाहून केवळ दुचाकी जाईल, एवढाच रस्ता शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे.समगा येथे पूल तुटल्यामुळे पूर, येडूद, जामगव्हाण, वसई, माळधामणी इ. गावांकडे जाणारी वाहने मात्र सध्या उमरा येथून तर काही ठिकाणाहून मार्गस्थ होत आहेत. अद्यापपर्यंत या ठिकाणी पूल दुरूस्तीच्या कोणत्याही हालचाली सुरू नसल्याने हिंगोलीच्या ठिकाणी येणाºया ग्रामस्थांची मात्र मोठी दैना होत आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची मोठी अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे पुलाची दुरूस्ती वेळीच करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. हा एकमेव रस्ता असल्याने गैरसोय होत आहे.
पावसामुळे पूल तुटल्याने गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:23 AM