हिंगोली शहरात काही विक्रेते कोरोना पसरेल अशा रीतीने दुकाने उघडी ठेवीत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जुलै रोजी पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. यावेळी शहरात ठिकठिकाणी ७ विक्रेते कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. तसेच स्वत: व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा रीतीने दुकाने उघडी ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांच्या फिर्यादीवरून मो. गुफरान मो. फारूख (रा. मंगळवारा) , आबेद खॉ हमीद खॉ पठाण (रा. रिसाला बाजार), साजीद खॉ मजीद खॉ पठाण (रा. आझम कॉलनी), निरज बन्शीलाल शाहू (रा. पेन्शनपुरा), अक्षय जगदीश शाहू (रा. गोलंदाज गल्ली), शेख माजीद शेख खाजा (रा. मंगळवारा), मो. जाविद मो. ख्वाजा (रा. आझम कॉलनी) यांच्याविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. तपास पोना जाधव करीत आहेत.
जवळा बाजार येथेही कारवाई
औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथेही पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोकॉ सचिन सांगळे, पोकॉ वनराज पाईकराव, पोकॉ विशाल काळे यांच्या फिर्यादीवरून साबेर खॉ सिकंदर शेख (रा जायगाव ता. परळी, हमु. लोधी गल्ली जवळा बाजार), शेख आजम शेख रमजान (रा. जवळा बाजार), अनीस कलीम शेख (रा. साधूनगर) यांच्या विरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस करीत आहेत.