२५ एप्रिल रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील खुशालनगर, सिद्धार्थनगर, रिसाला बाजार, आदी नगरामध्ये पथकाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कारवाईस प्रारंभ केला. या दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ५ हजार ४०० रुपये दंड स्वरुपात वसूल करण्यात आले. त्याचबरोबर विनामास्क फिरणाऱ्या दोघांना दोनशे रुपयांप्रमाणे दंड लावण्यात आला.
ही कारवाई अभियंता गजानन हिरेमठ, ईटापल्ले, नाईक, डी. बी ठाकूर, पंडितराव मस्के, बी. के राठोड, संदीप घुगे, ए. एम. गवळी, आसोले, नितीन पहीनकर, संघपाल नरवाडे, मनोज बुर्से, संदीप गायकवाड यांनी केली.
ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना आवाहन
२५ एप्रिल ते १ मेपर्यंत शहरातील दुकानदारांनी संचारबंदीचे उल्लंघन करू नये. त्याचबरोबर शहरात विनाकारण आणि विनामास्क फिरू नये, अशी सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे नगरपरिषदेने दिली. जे कोणी संचारबंदीचे उल्लंघन करेल त्याच्यावर दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाईही केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी सांगितले.
फोटो लोगोटाईप