शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

सामाजिक अंतर नियमाचा भंग; हिंगोलीतील चार बँक शाखा व्यवस्थापकांची पोलिसांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 2:52 PM

चारही बँकेचे शाखा व्यवस्थापक हिंगोली शहर ठाण्यात बराच वेळ बसून होते.

हिंगोली : सामाजिक अंतर न पाळल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हिंगोली शहरातील चार बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावून घेतले.

हिंगोली शहरातील विविध बँकेच्या चार शाखा व्यवस्थापकांना पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावून घेतल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे बँकेतील कार्यालयीन कामकाज काहीवेळ बंद ठेवण्यात आले होते. बँक शाखा व्यवस्थापकांना का बोलावले, हा नेमका काय प्रकार सुरू आहे, याबाबत एकच चर्चा सुरू होती. परंतु सोशल डिस्टन्स पाळले जात नाही, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने बँक शाखा व्यवस्थापकांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. चारही बँकेचे शाखा व्यवस्थापक हिंगोली शहर ठाण्यात बराच वेळ बसून होते. परंतु शाखा व्यवस्थापकांना ठाण्यात बोलावून नेल्याने काहीवेळ बँकेतील कामकाज ठप्प होते. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता डीवायएसपी रामेश्वर वैंजणे यांनी दुजोरा दिला. शिवाय याप्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली