लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठा व्हावा तसेच वीजेसंबधी समस्यांचा लवकर निपटारा लागावा, यासाठी महावितरणकडून ग्रामविद्युत सेवकांची नियुक्ती करावी असे शासनाचे आदेश आहेत. सदर प्रक्रिया वीज कंपनीकडून जिल्ह्यात सुरू असली तरी महावितरणच्या संबधित विभागातील वरिष्ठांचे आदेशच न मिळाल्याने एकाही गावात ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही.महावितरणकडून ग्रामीण भागात वीजपुरवठा करताना वीजेसंबधी येणाऱ्या अडी-अडचणी दूर करणे, वीजेमुळे होणाºया दुर्घटना रोखता याव्यात व ग्रामस्थांना सुरळीत वीज पुरवठा केला जावा यासाठी तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविद्युत सेवक नियुक्तचा निर्णय ग्राम विकास व ऊर्जा विभागाने घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ५६३ पैकी तीन हजार लोकसंख्या असलेल्या ५१३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी महावितरणकडे १८० ग्रामपंचायतीनीं ठराव घेऊन पात्र ग्रामविद्युत सेवकांचे प्रस्ताव महावितरणकडे पाठविले आहेत. परंतु महावितरणकडून अद्याप एकाही ग्रामविद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शासनाकडून निकष पूर्ण करणाºया सेवकांना नियुक्तीच्या सूचना असल्या तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाची प्रतिक्षा प्रस्ताव सादर केलेल्या सेवकांना आहे. ही प्रक्रिया संथपणे होत असल्यामुळे एकाही सेवकाची नियुक्ती नाही.दहावी उतिर्ण व आयटीआयमधून विद्युत तंत्री किंवा इलेक्ट्रिकल या विषयात शिक्षण घेतलेले उमेदवार या पदासाठी पात्र आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील ३३३ ग्रामपंचयातींना पात्रताधारक उमेदवारच मिळाले नाहीत. तर १८० ग्रा. पं. ने ठराव घेऊन सेवकांचे प्रस्ताव महावितणकडे पाठविले तरी नियुक्ती मात्र होईना.हिंगोलीत तीन हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या १०२ पैकी २१ ग्रामपंचायतींनी महवितरणकडे ग्रामविद्युत सेवकांचा ठराव पाठविला. तर ८१ मध्ये पात्र उमेदवारच मिळाले नाही. कळमनुरी ११४ पैकी ६१ ग्रा.पं.ने प्रस्ताव पाठविले. तर ५३ ग्रा. पं. ना उमेदवारच मिळाले नाहीत. वसमत तालुक्यात १०८ पैकी ३४ ग्रां.प.चे प्रस्ताव आहेत. तर ७४ मध्ये उमेदवार मिळाले नाहीत. औंढ्यात ९४ पैकी ३८ प्रस्ताव पाठविले, तर ५६ ग्रा.पं. ना उमेदवार मिळाले नाहीत. सेनगाव तालुक्यातील ९५ पैकी २६ ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविले असून ६९ ग्रा. पं. ना उमेदवार मिळालेच नाही.महावितरणकडे प्राप्त ग्रामविद्युत सेवकांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू आहे. वरिष्ठांचे आदेश मिळताच पुढील प्रक्रिया पार पाडून सेवकांना नियुक्तीचे आदेश दिले जातील. अधीक्षक अभियंता जाधव
ग्रामविद्युत सेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:42 PM