लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुलींच्या वसतिगृहाचे चांगले काम होणार असल्याने जागेचा ठराव तत्काळ मंजूर केला. मात्र नाहरकत न घेताच संबंधित गुत्तेदाराने कामच सुरू केले. जागेशिवाय टेंडर काढण्याची उलटी गंगा कशी वाहिली, असा सवाल सदस्यांनी केला.या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, सुनंदा नाईक, प्रल्हाद राखोंडे, अति मुकाअ ए.एम.देशमुख, उपमुकाअ नीलेश घुले यांची उपस्थिती होती.यावेळी विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी वनविभागामार्फत राबविण्यात येणाºया गॅस योजना व चार भाकड जनावरांच्या बदल्यात एक दुधाळ जनावर ही योजना सांगितली. त्यावर भाकड असली तरीही ती शेणखत देणारी असल्याने उपयुक्तच ठरतील, असे सांगितले. घरकुलांचा तिसरा हप्ता मिळत नसल्याची तक्रार जि.प.सदस्य कावरखे यांनी केली. तर प्रत्येक ग्रामसेवकास सीमकार्ड देण्याची मागणी केली होती. मात्र सर्व ग्रामसेवकांच्या क्रमांकाची यादी देत सीमकार्ड देता येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यावर जि.प. सदस्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत त्यांचे फोन घेण्यास ग्रामसेवकास बजावल्याचे सांगण्यात आले.लोहरा येथील शेतकºयाची जमीन तलावासाठी भूसंपादित केली नसताना ती बुडित क्षेत्रात गेली. त्याचे भूभाडे देण्याचा मुद्दा एकदा जि.प. सदस्या वैष्णवी घुगे व डॉ.सतीश पाचपुते यांनी लावून धरला होता. मात्र संबंधितास भाडे देता येत नसल्याचेच प्रशासनाने सांगितले. त्याचा मावेजा देण्याचा प्रस्ताव मात्र पाठविल्याचे सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा होणाºया औषधीचा मुद्दाही निघाला. लहान मुलांची औषधीच येत नसेल व त्याचे काही नियोजन नसेल तर राज्य स्तरावरून होणाºया खरेदीला अर्थ काय? असा सवाल डॉ.सतीश पाचपुते यांनी केला.६0 जणांची जातवैधता नाहीजिल्हा परिषदेतील तब्बल ६0 कर्मचाºयांची जातवैधता अजूनही झाली नसल्याचे समोर आले आहे. तसा अहवालच जि.प.ने तयार केल्याचे सांगण्यात आले. याबाबत जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते म्हणाले, एवढ्या वर्षांपासून ही मंडळी कार्यरत राहात असेल तर कारवाई का झाली नाही? मात्र आता शासनास याबाबत कळविले असल्याचे उपमुकाअ नीलेश घुले यांनी सांगितले.दरम्यान, नरवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जि.प. सदस्या खुडे यांनी मांडला. या आजीबाईने पहिल्यांदाच अतिशय शांतपणे मांडलेल्या या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले. तर रिक्त पदे, प्रतिनियुक्त्या, सिझरिंगचे जिल्हा शिबीर हेही मुद्दे चर्चेत आले.भरती घोटाळा : सदस्याकडे पुरावाजि.प.च्या भरती घोटाळ्याचा प्रश्न यापूर्वीच्या सभेत जि.प.सदस्या वैष्णवी घुगे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी याचे काही पुरावे आहेत काय? अशी विचारणा करण्यात आली हाती. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची त्यांची मागणी होती. आता त्यांनी पुरावाचउपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र तरीही शासनाकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले. यावर जर भरतीत पैशाच्या जोरावर अपात्र लोक नोकरी मिळविणार असतील तर कठोर मेहनत घेणाºया होतकरूंवर हा अन्याय आहे. आयुक्तांकडे दाद मागू, असे घुगे यांनी सांगितले.
वसतिगृह कामासाठी उलटी गंगा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:50 PM
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : मुलींच्या वसतिगृहाचे चांगले काम होणार असल्याने जागेचा ठराव तत्काळ मंजूर केला. मात्र नाहरकत न ...
ठळक मुद्देरात्री सव्वासात वाजेपर्यंत चालली सभा : विविध विषयांवर सदस्य होते आक्रमक