कृषी विभाग व महाबीजच्या संयुक्त विद्यमाने ग्रामबीजोत्पादन हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्याला हरभरा पिकासाठी ४३०० क्विंटल, तर गहू पिकाचे ३५० क्विंटलचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यात प्रतिशेतकरी एक एकरच्या मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. हरभरा पिकासाठी दहा वर्षांच्या आतील जातीच्या बियाण्यांसाठी २५ रुपये प्रतिकिलो अनुदान, तर १० वर्षांवरील जातीच्या बियाण्यांसाठी १२ रुपये प्रतिकिलो अनुदान देण्यात येणार आहे, तसेच गव्हाच्या बियाण्यासाठीही दहा वर्षांच्या आतीलसाठी २०, तर त्यावरीलसाठी १० रुपये प्रतिकिलो अनुदान आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. २५ सप्टेंबर ही यासाठीची शेवटची तारीख आहे. अडचण असल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी बळीराम कच्छवे यांनी केले आहे.
गहू व हरभरा बियाणे अनुदानावर मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:31 AM