लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाभरात पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया २७ फेबु्रवारी रोजी पार पडली. काही ठिकाणी शांततेत तर काही मतदान केंद्रावर काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी तगडा पोलीस बंद होता. हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका व बळसोंड येथे मतदान झाले.कळमनुरी तालुक्यातील तीन ग्राम पंचायती करीता ३ मतदान केंद्रावरून पोटनिवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये स्त्रीयांचे ४६४ तर पुरूष ५५५ एकूण १०१९ मतदान झाले. सदर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.पुसेगाव येथे ६५ टक्के मतदानपुसेगाव : येथील ग्राम पंचायत वार्ड क्र.४ मध्ये पोटनिवडणुकीत मंगळवारी ८९३ पैकी ५८२ मतदान झाले. शांततेत मतदान पक्रिया पार पडली. वार्ड क्रमांक ४ मधील एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात होते. ६५ टक्के मतदान झाले. यावेळी तलाठी चंद्रकांत साबळे, पोलीस पाटील पप्पू जैस्वाल, जमादार विजय शुक्ला, पंढरी चव्हाण, गारूळे आदी उपस्थित होते.कुरूंद्यात बंदोबस्तात मतदानकुरूंदा : येथे ग्रामपंचायत निवडणुकीत एका जागेसाठी मंगळवारी पोलीस बंदोबस्तामध्ये शांततेत मतदान पार पडले. मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ८१ टक्के मतदान झाले आहे. बुधवारी निकाल असल्याने तालुक्याचे निकालाकडे लक्ष लागले आहे. कुरूंदा येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेकरिता निवडणूक असल्याने एका दिवसापूर्वी रविवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. त्यामुळे वार्ड क्र. ६ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका जागेसाठी होणाºया निवडणुकीला अस्तित्वाची लढाईचे स्वरूप आल्याने वसमत तालुक्याचे लक्ष कुरूंद्याच्या पोटनिवडणुकीकडे लागले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने दक्षता घेत मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. तर डीवायएसपी शशिकिरण काशीद हे ठाण मांडून होते. कडेकोट बंदोबस्तामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जि.प.सदस्याचे पती रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला महत्त्व आले होते. वार्ड क्र. ६ मध्ये १५०७ पैकी १२२० मतदान झाले असूण एकूण ८१ टक्के मतदान झाले.कनेरगाव नाका : येथील ग्रामपंचायतची २६ फेब्रुवारी पोट निवडणूक दोन वार्डाची निवडणूक घेण्यात आली. वार्ड क्र. ३ मधील लक्ष्मीबाई पांडुरंग गावंडे, रूपाली रामेश्वर बर्वे, १ मधील उमेदवार शारदा सुमेध घुगे, सीमा भारत पठाडे, महिला निवडणूकीत उभ्या होत्या. मतदानाच्या वेळी कानरखेडा खु. येथील ४० मतदारांचे नावे येथील मतदान यादीत असल्याने काहीवेळ गोंधळ झाला होता. परंतु नंतर मतदान सुरळीत पार पडले. वार्ड क्र. १ मधील ५६० पैकी ३६२ मतदान झाले. त्यामध्ये १९१ पुरूष व १७१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर वार्ड क्र. ३ मध्ये ७७७ मतदारसंख्या आहे. त्यापैकी ४७४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २५९ पुरूष व २१५ महिलांनी मतदान केले. वार्ड क्र. १ मध्ये ६४ टक्के मतदान तर वार्ड क्र. ३ मध्ये ६१ टक्के मतदान झाले. दोन्ही बुथवर शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
कुठे शांततेत तर कुठे तणावात ग्रा.पं. पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:05 AM