लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येथील जि .प. हायस्कूलमध्ये प्रचंड मोठी विद्यार्थी संख्या असतानाही येथे तब्बल सोळा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकमेव इंग्रजीचा शिक्षक असलेल्या एम. ए. सय्यद यांना अल्पसंख्याक समन्वयक म्हणून प्रतिनियुक्ती देऊन प्रशासनाने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. इंग्रजीच्या शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करा, रिक्त जागा भरा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बाळापूरच्या ग्रामस्थांनी दिला आहे.आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेली शाळा म्हणून गणली जाते. कायमस्वरूपी नियुक्त असलेले इंग्रजीचे शिक्षक सय्यद यांना जिल्हा परिषद हिंगोली येथे अल्पसंख्याक समन्वयक म्हणून प्रतिनियुक्ती दिली आहे. त्यामुळे पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे नुकसान होत आहे. विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एम.ए.सय्यद यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांना मूळ पदावर परत पाठवावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, तसेच येथील शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे बाळापूरकरांनी दिला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर विठ्ठल पंडित, यशवंत पंडित, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, अनिल जोगदंड, नीरज पंडित, अनिल पंडित, ओम प्रकाश पंडित, दयानंद पंडित, दत्ता इंगोले, प्रभाकर इंगोले, भगीरथ पंडित, शैलेश नितनवरे, रोहित पंडित, संजय पंडित, आकाश पंडित आदींच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनाची प्रत हिंगोली व कळमनुरी येथील शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाºयांना देण्यात आली. एकंदरीत जि. प.च्या शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न चांगलाच चिघळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.---बदली प्रकरणात सातही शिक्षकांची घरवापसीयेथील जि.१३०० विद्यार्थी आहेत. तसेच २६ तुकड्या आहेत. परंतु येथे शिक्षकांची १६ पदे रिक्त आहेत. मध्यंतरी रिक्त जागा भराव्यात अशी मागणी केल्यानंतर कळमनुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाºयांनी विस्थापित असलेल्या शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली होती. परंतु बदली प्रकरणात सातही शिक्षकांची घरवापसी झाली आणि जिल्हा परिषद हायस्कूलला या बदल्यांमध्ये केवळ चार शिक्षक उपलब्ध झाले. त्यामुळे येथील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम राहिला. शाळेत एकूण २६ तुकड्या असल्या तरी येथे १६ पदे रिक्त आहेत.