शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:54 PM

लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.गुजरात राज्याच्या जबाबदारीमुळे खा.राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे राज्य असल्याने त्यांना पूर्ण वेळ मिळण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र सातव यांच्यानंतर दुसरा कोणी सक्षम उमेदवार समोर आला नाही. इतर अनेकांना विधानसभा निवडणूकच लढवायची आहे. त्यामुळे ऐनवेळी माजी खा.सुभाष वानखेडे यांना आयात करावे लागले. त्यांची निवड करताना लोकसभेत येणाऱ्या आघाडीच्या सर्व आजी-माजी आमदारांना विश्वासात घेतले. एवढेच नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारीही दिली. या सर्व प्रकारांत हिंगोलीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे आघाडीवर होते. तसेच आ.प्रदीप नाईक, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.विजय खडसे यांनाही विचारणा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक राव चव्हाण, खा.राजीव सातव यांनी वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र आता हिंगोली विधासनभेतच अडचण निर्माण झाली आहे. प्रचारयंत्रणा कामाला लावण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांना साधे निमंत्रणही नाही. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी समाज माध्यमांवरून व्हायरल केलेल्या संदेशात त्यांचे नाव व छायाचित्रही नाही. त्यावरून आता गोरेगावकर समर्थक पुन्हा बुचकळ्यात पडले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाईपर्यंत सर्व काही ठीक होते. आता अचानकच पुन्हा चित्र का बदलले, असा सवाल केला जात आहे.काँग्रेसमधील गट-तट नेहमीच पराभवाला कारण ठरत असतात. मागच्या जि.प. निवडणुकीतही तोच अनुभव आला होता. आता पुन्हा लोकसभेला तेच चित्र निर्माण झाले आहे. भाजपमधून उमेदवारीसाठीच काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडे यांना नीट काही कळायच्या आतच हे सगळे प्रकार घडून जात आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघात जोर असतानाही एकही मूळकाँग्रेसी का उभा राहिला नाही, यामागचे गणित त्यांना कळाले असेल. त्यांनी वेळीच सावरून न नेल्यास बळीचा बकरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मतभेदांची ही भिंत तोडायची कशी, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस