शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला? छगन भुजबळांचा थेट सवाल

By विजय पाटील | Published: November 26, 2023 6:39 PM

'मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध; एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या.'

हिंगोली: मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा. ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केली. रामलीला मैदानावर झालेल्या या सभेस प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, खा.रामदास तडस, आ. प्रज्ञा सातव, आ. राजेश राठोड, टी. पी. मुंडे, माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. रामराव वडकुते, बबन तायवाडे आदी ओबीसी नेते उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, मी बोललो तर दोन समाजात तेढ निर्माण करू नका म्हणतात. पहिल्यांदा तर ते बोलले. तुमचा खुटा उपटील म्हणाले. करे कर काय करायचे ते? तरीही आम्ही बोललो नाही. आम्हाला दोन महिन्यांपासून रोज शिव्या घालताहेत. पोलिसही ते वाचू शकले नाहीत. जाळायला अक्कल लागत नाही जोडायला अक्कल लागते.

ओबीसीविरुद्ध षडयंत्र

एकीकडे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात दाद मागत आहेत. जे ओबीसीत आहेत, ते कसे चुकीचे आहेत, असे सांगून आमचे काढून त्यांना आरक्षण मागण्याचा डाव आहे, असेही भुजबळ म्हणाले.

ओबीसींची लायकी काढायचा अधिकार कुणी दिला?

उपोषण नेते म्हणतात की, ओबीसींच्या हाताखाली काम करणे शोभत नाही. आमची लायकी नाही. याच नेमकं म्हणनं तरी काय? हे मराठा नेते का विचारत नाहीत. लायकी होती म्हणूनच अठरा पगड जातीतील शूरवीर छत्रपती शिवरायांसोबत लढले. ओबीसी देशाचा निर्माता आहे. शिवाय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी उमेदवार ओपनच्या बरोबरीची किंबहुना त्यापुढेही गुणवत्ता सिद्ध करीत असल्याचे सांगताना त्यांनी आकडेवारीचा दाखलाच भुजबळ यांनी दिला.

मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोधमराठा समाजाला वेगळे १२, १५ टक्के आरक्षण द्या. त्यासाठी आमच्यावर बुलडोझर चालवू नका. आमचा गरीब मराठ्यांना विरोध नाही. मात्र जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे. अंतरवाली प्रकरणातील आरोपी बेदरेकडे पिस्तूल आढळले. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली. जर कुणाला गावबंदी केली तर एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. मग पोलिसांनी आतापर्यंत कुणावरच का कारवाई केली नाही? असा सवालही भुजबळ यांनी केला.

एकदा जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्याराहुल गांधी, शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळीच मंडळी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. येथेही अनेकांनी केली. एकदा अशी गणना होऊनच जाऊ द्या. बिहार अशी गणना करू शकते तर महाराष्ट्र का नाही करू शकत? असा सवालही भुजबळ यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळHingoliहिंगोलीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण