लोकमत न्यूज नेटवर्कखुडज : वन्य प्राण्यांच्या हैदोसाने नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांना हाकलून लावण्यासाठी केलेल्या विविध प्रयोगांना रोही, हरीण, रानडुकर हे प्राणी भीत नाहीत. परिसरातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून सध्या शेतकºयांकडून रात्रीचा दिवस करून पिके जगवण्यासाठी शेतकºयांची धडपड चालू असताना शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला पिकांची प्रचंड नासाडी होत असल्याने शेतकरी वैतागला आहे.आधीच शेतकरी दुष्काळाने होरपळलेला असताना शेती पिकांवर घेतलेले कर्ज, उसनवारीही फिटेना. सेनगाव तालुक्यातील वनक्षेत्रात हे प्रकार चालू आहे. वनविभागाची यंत्रणा कुचकामी असल्याची ओरड शेतकºयांतून घेताना दिसत आहे. परिसरातील माळरानात वनविभागामार्फत वन्यप्राण्याच्या सोयीसाठी पाणवठेही नसल्याने प्राण्यांची व्यवस्थाही रामभरोसे असल्याचे चित्र आहे. यामुळे वन्य प्राणी पाणी व चाºयासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. खुडज परिसरातील वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रात लाखो रुपयांची झाडे लावण्यासाठी केलेला खर्च झाडे पूर्णत: वाळल्याने पाण्यात गेल्याचे चित्र आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळाशी दोन हात करून लढत असताना परिसरातील वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षणासाठी दमछाक होताना दिसून येत आहे. परंतु वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांतून संताप व्यक्त केला जात असून वन्य प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
खुडज परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:37 PM