शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

हिंगोली लोकसभेत वाहतेय महाविकास आघाडीचे वारे; सहाही विधानसभांमध्ये आघाडीला मताधिक्य

By विजय पाटील | Published: June 06, 2024 4:59 PM

महायुतीचा विधानसभेचा प्रवास अधिक खडतर होणार आहे.

हिंगोली : लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभांमध्ये कमी-अधिक प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी काळातील राजकारणाची दिशा बदलत असून वारे कुणीकडे वाहतेय याचा अंदाज येत आहे.

हिंगोली लोकसभेत विद्यमान खा. हेमंत पाटील यांचे जाहीर केलेले तिकीट कापून शिंदेसेनेने नवा चेहरा म्हणून बाबूराव कदम यांना मैदानात उतरविले. कदम मैदान गाजवतील, असे पक्षाला अपेक्षित होते. मोठी रसद आणि पाच आमदारांचे बळ असल्याने अतिआत्मविश्वास होता. पाटील यांच्या रणनीतीवरही पक्षाने विश्वास ठेवला नाही. पाटील यांना त्यांच्या पक्षाचेच कळमनुरीचे आ. संतोष बांगर यांच्यासह हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, उमरखेडचे आ. नामदेव ससाणे, किनवटचे आ. भीमराव केराम यांनी विरोध केला. वसमतचे आ. राजू नवघरे यांच्यासोबत तर पाटील यांचे आधीच जमत नव्हते. आता पाटील पुन्हा हिंगोली लोकसभेत सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. तसे झाले तर पाटील यांचा विरोध या मंडळींना परवडणारा नाही. आधीच महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार झुकला आहे. त्यात या वादाचे पडसाद उमटले तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही धक्का बसण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. महायुतीचा विधानसभेचा प्रवास अधिक खडतर होणार आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत आधीचे लोकसभेचे ट्रेंड कायम राहिले होते. त्यामुळे यावेळीही तसे झाले तर पाटील यांनी कुणाला विरोध केला नाही तरीही विद्यमान आमदारांना किनारा गाठणे अवघड आहे. वैयक्तिक किमया साधली तर भाग वेगळा.

मागच्यावेळी हेमंत पाटील यांना २ लाख ७५ हजारांवर मताधिक्य होते. शिंदेसेनेला तरीही १ लाख ८ हजारांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसच्या मतांचा फायदा उद्धवसेनेला झाल्याचे दिसत आहे तर त्यांच्यातील एकजुटीचे दर्शनही यातून घडले. याशिवाय मराठा आरक्षणाचा चिघळलेला मुद्दा आघाडीच्या पथ्यावर पडला. मुस्लीम समाजाने भाजपवरची नाराजी मतदानातून स्पष्ट केली. संविधान बचावने काही प्रमाणात दलित मतेही वळली तर मणिपूरमुळे आदिवासी मतांनीही आघाडीच्या पारड्यात वजन टाकले. त्यामुळे डझनभर बड्या नेत्यांनी सभा घेऊनही महायुतीला पराभवाचा हादरा बसला.

वंचित फॅक्टरही दिसलायावेळी वंचित फॅक्टरचा फटका महायुतीला बसला. मागच्या लोकसभेला वंचितने १ लाख ७५ हजार ५१ मते घेतली होती. यंदा चौदा हजाराने घट झाली. वंचितचे बी. डी. चव्हाण यांना १ लाख ६१ हजार ८१४ मते मिळाली. त्यामुळे इतरत्र हा फॅक्टर दिसला नसला तरीही हिंगोली लोकसभेत तो दिसला. विधानसभेला या भागात तरी पुन्हा तो त्रासदायक ठरणार आहे.

हिंगोली लोकसभेत प्रमुख उमेदवारांची मतेविधानसभा नागेश आष्टीकर बाबूराव कदम बी. डी. चव्हाणउमरखेड ८२४३५ ७५०९० १९२१७किनवट ७६५६७ ६२६३९ १८११३हदगाव ७५३८९ ७३७५१ २४७८३वसमत ८४६४६ ५४०९६ ३४२०३कळमनुरी ८४१२० ६३१०० ३४१४५हिंगोली ८७२७५ ५३९२३ ३०८६३पोस्टल २१०३ १३३४ ४९०एकूण ४९२५३५ ३८३९३३ १६१८१४

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४