शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आधी पगार नंतरच माघार; प्राध्यापकांचे राज्यभर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 4:54 PM

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून उपोषण केले जात आहे. 

हिंगोली : प्राध्यापकांना त्यांच्या हक्काचा पगार मिळावा यासाठी १ जून पासून राज्यभर घरात बसून उपोषण सुरू केले आहे. राज्यातील जवळपास २२५०० प्राध्यापक उपोषणात सहभागी झाले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील ३०० प्राध्यापकांनी यात सहभाग नोंदविला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून उपोषण केले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेचे राज्यातील उच्च माध्यमिक प्राध्यापक मागील वीस वर्षांपासून एक रुपयाही पगार न घेता विद्यादानाचे कार्य करीत आहेत. हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने पुकाराल्याने सप्टेंबर २०१९ रोजी शासनाकडून (१४६ +१६३८) शाळा घोषित करण्यात आल्या व १ एप्रिल २०१९ पासून या प्राध्यापकांना २० टक्के अनुदान जाहीर केले. त्यानंतर जवळपास १०७ कोटींचा निधी मंजूरही करून घेतला. त्यानंतर पुढील सर्व किचकट प्रक्रिया पूर्ण करून देखील मंजूर झालेला निधी वितरणाचा आदेश शासनाने अद्याप निर्गमित केला नाही. त्यामुळे शासन आदेश त्वरित निर्गमित करून अघोषित शाळा महाविद्यालयांना घोषित करावे व अनुदान द्यावे. प्राध्यापकांना शासनाने न्याय द्यावा. विशेष म्हणजे कोरोना संकटाचे निमित्त करून निधी वितरणाचा आदेश काढण्यास दिरंगाई केली जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. 

अनेकांनी आत्महत्या केल्यायाकामी होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हवालदिल झाले असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून नैराश्यातून राज्यभरात जवळपास ९५ शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच याच दिरंगाईमुळे  पाच शिक्षकांचा तणावाखाली येऊन मृत्यू झाला आहे. परंतु अद्याप शासन गंभीरतेने दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे प्राध्यापकांच्या मागण्यां तात्काळ पूर्ण कराव्यात व न्याय द्यावा यासाठी राज्यभर उपोषण सुरू केल्याची माहिती प्रा. आशिष इंगळे यांनी दिली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक कमवी शाळा कृती संघटनेचे हिंंगोली जिल्हाध्यक्ष प्रा.आशिष इंगळे, कार्याध्यक्ष प्रा. पंडित डाखोरे, प्रा. सुनील डुकरे, प्रा. बालाजी जांबूतकर, प्रा. सुनील जगताप, प्रा.संतोष घुंगरे, प्रा. मालवतकर, प्रा.विष्णू उबाळे, प्रा.गौतम दिपके, प्रा. प्रशांत चाटसे आदींना दिला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीProfessorप्राध्यापकfundsनिधीEducationशिक्षणagitationआंदोलन