लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या पावसाने ओढ दिलेली असल्याने सिंचनाची सोय असलेले शेतकरी कृषीपंपाने पाणी देत आहेत. मात्र अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आता महावितरणनेही १00 टक्के वसुलीशिवाय संबंधित रोहित्र बदलून दिले जाणार नसल्याचे जाहीर निवेदन केल्याने शेतकऱ्यांची गोची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्याच दीडशेवर रोहित्र जळालेले आहेत. दररोज यात भर पडत आहे. मात्र जळालेले रोहीत्र बदलून देण्यासाठी कधी आॅईलची तर कधी इतर अडचण येते. महावितरणचा हा प्रश्न नेहमीचाच आहे. गतवर्षीही ऐन रबीच्या तोंडावरच महावितरणने वसुली सुरू केली होती. त्यावरून बरीच ओरडही झाली होती. मात्र वसुलीशिवाय रोहित्र देण्यात आले नव्हते.अनेकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.आता पुन्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता सु.बा.जाधव यांनी रोहित्र जळाल्यास त्या रोहित्रावरील १00 टक्के शेतकºयांनी थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र बदलून मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे आॅईलमुळे आधीच रोहित्र मिळत नसताना थकबाकी भरल्यावरही रोहित्र मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे आॅईलच्या समस्येवर तोडगा काढणे हे क्रमप्राप्त दिसत आहे. खरीप हंगाम हाती येत असल्याने महावितरणनकडून वसुलीसाठी फंडा वापरला जात असला तरीही पावसाने उघडीप दिल्याने हा हंगामच धोक्यात आहे. त्यामुळे आताच सक्ती केल्यास शेतकरी थकबाकी भरू शकेल, अशी शक्यता दिसत नाही.ऊर्जामंत्र्यांना भेटणारमहावितरणकडून शेतकºयांना रोहित्र बदलून दिले जात नाहीत. आॅईलसह अनेक समस्या सांगितल्या जात आहेत. तर अधिकाºयांना जाब विचारला तर पुढे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत, अशी तक्रार भाजप नेते रामरतन शिंदे यांनी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. एवढेच नव्हे, तर याबाबत पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्यामार्फत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे. पालकमंत्र्यांकडेही हा प्रश्न मांडल्याचे त्यांनी सांगितले. २00 नवीन डीपींसाठी उर्जामंत्र्यांना आग्रह धरण्याचे आश्वासन कांबळे यांनी दिले.आमदारांचेही निवेदनआ.तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकाºयांची बैठक नुकतीच बैठक घेतली. तर आता उर्जामंत्र्यांची भेट घेवून विविध वीज केंद्रांना निधी व डीपी दुरुस्तीस आॅईल व २00 नवीन डीपींची मागणी केली.
थकबाकी भरल्याशिवाय रोहित्र मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:10 AM