जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे २३ जानेवारी रोजी सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वडद येथील गीता पिराजी वेईद (वय २८) या महिलेने तिचे आजोबा मृत्यू पावल्याचे दुःख सहन न झाल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ६ ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मयत महिलेचे जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची फिर्याद मुंजाजी विठ्ठल मलांडे (रा. करंजी) यांनी हट्टा पोलिसात दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश ठाकूर करत आहेत.
वडद येथे महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:31 AM