याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष वैशाली वाघ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, येथे अवैध दारू विक्री वाढली आहे. संबंधित बीट जमादार लक्ष देत नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. यापूर्वी तहसील सेनगाव, नर्सी नामदेव पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात ही निवेदन दिले. मात्र फायदा झाला. याबाबत काळे यांच्यासमोर कैफियत मांडताना महिला म्हणाल्या की, आता हे दारू विक्रेते घरी येऊन धमकावत आहेत. शिवाय आमच्या पतींना ही ते चिथावत असून अनेकांना यामुळे मार खावा लागत आहे. ही अवैध दारू संसारात विष कालवत असून ती बंद झाली नाहीतर आमचे जे होईल ते सहन करू. मात्र दारूबंदी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले. यावेळी नंदा पोहकर, बेबी पोहकर, तारामती पोहकर, रुख्मीना गरपाळ, शांताबाई खडसे, सुनीता जाधव, दैवशाला जाधव, पंचफुला जाधव, शोभा मुडे, चित्रलेखा कुटे, नंदा मुंडे, गोकर्णा गायकवाड आदींची उपस्थिती होती.
अवैध दारूविक्रीविरुद्ध महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:21 AM