लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बचत गटातील महिलांना बचतीचे नियोजन १०० वेळा सांगूनही जर त्यांच्या काहीच फरक पडत नसेल तर त्यांची प्रगती होणार तरी कशी? आपल्यासह कुटूंबाची प्रगती होण्यासाठी महिलांच्या मानसिकतेत खरोखरच बदल होणे गरजेचा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी धान फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमात केले.शासन जरी विविध योजना राबवित असले तरी त्याचा लाभ घेण्यासाठी लोकसहभाग हा अतिशय महत्वाचा भाग असतो. लोकसहभाग असेल्या बचत गटाचा कोणत्याही योजनेसाठी प्राधान्यांने विचार केला जातो. त्यामुळे बचतगटातील महिलांनी याचा फायदा जरुन घ्यायला हवा. बँकेशी व्यवहार चांगले ठेवल्यास बँकेकडून वाढीव कर्ज मिळून विविध उद्योग उभारणे शक्य होण्यास मदत होते आदी संदर्भात तहसीलदार गोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मिरा गणगे यांनी देखील बचत गटातील लहानसहा बाबी सजमजून सांगितल्या. त्यांनी सांगितले शासन विविध योजना राबवित आहे. महिलासांठी राबविण्यात येणाºया योजनांकडे डोळे झाक करुन चालणार नाही तर त्या योजनांचा फायदा घेऊन महिलांने निर्भिड पणे उभे राहणे गरजेचे आहे. घराचा संपूर्ण भार हा महिलेवर असल्याने त्या अतिशय काटकसरीने संसार चालविण्याचे नियोजन करतात. तर महिलाच पदराने दु:ख आणि सुख झेलू शकतात. धनी सोडून गेला तरीही न खचून जाता आपल्या चिल्यापिल्यांना पांखरासाखरे उडण्याचे बळ देऊ शकतात. तर आर्थिक विकासाची वाटचाल बचत गटाच्या रस्त्यावरुन जाते आदी उदाहरणे देत महिलांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविक विभागीय समन्वयक महादेव पुरी यांनी तर सूत्रसंचालन प्रविण भिक ले केले. आभार अनिल दवणे यानी मानले. यशस्वीतेसाठी हनुमान जगताप, प्रदीप रणखांब, अमोल ससाणे, मयूर ठवळी, गणेश तिखांडे, गुलाब गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हाभरांतून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.विविध योजनेतून बचत गटांना मिळणाºया योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्ष संस्थेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. जणे करुन त्यांना या प्रशिक्षणामुळे ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे आहे. त्यासाठी उपयोग होईल. परंतु बहुधा महिला अर्धवट प्रशिक्षण सोडत असल्याचे दिपाळी काळे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना योजनेंचा उपयोग घेताच येत नसल्याचे चित्र आहे. महिलांचे गणित पक्के असले तरीही त्या जगाच्या भितीपोटी स्वत:ला अडाणी म्हणून घेतात. त्यामुळे त्यांची प्रगती होण्या ऐवजी नेहमीच अधोगतीच होते.
महिलांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:15 AM