हिंगोली: पाण्याची कमतरता आणि जास्तीची पाणीपट्टी बिलामुळे २००८ पासून बंद असलेल्या स्वीमिंग पुलाचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
हिंगोली शहरानजीक लिंबाळा (मक्ता) येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात २००६ मध्ये स्वीमिंग पूल तयार करण्यात आला होता. परंतु, यानंतर मात्र स्वीमिंग पुलासाठी पाण्याची कमतरता पडू लागली. त्याचबरोबर जास्तीची पाणीपट्टीही येऊ लागली होती. जी की जिल्हा क्रीडा कार्यालयाला भरणे शक्य होत नव्हते. तसेच स्वीमिंग पुलाच्या आजूबाजूची टाईल्स फरशी उखडली गेली. दुरुस्तीचा खर्च परवडेना झाला होता. त्यामुळे २००८ पासून सदरील पूल हा बंद ठेवण्यात आला होता. यानंतर जिल्हा क्रीडा कार्यालयाने स्वीमिंग पूल दुरुस्तीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला. शासनाने स्वीमिंग पूल दुरुस्तीसाठी ४२ लाखांचा निधीही दिला असून स्वीमिंग पुलाची दुरुस्ती पंधरा दिवसांपासून वेगाने सुरू केली आहे. या दुरुस्तीमध्ये फिल्टर प्लांट, स्टोरेज टँक, टाईल्स, तलावाचा अंतर्गत आदी कामांचा समावेश आहे.
तीन महिन्यांत स्वीमिंग पूल होणार तयार
२००८ पासून अद्ययावत बांधलेला पाण्याच्या कमरतेमुळे तसेच डागडुजीमुळे बंद ठेवण्यात आला होता. आता पुलाच्या डागडुजी व इतर कामासाठी शासनाने निधी दिला असून याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये हा पूल खुला करण्यात येणार आहे. स्वीमिंग पूल तयार झाल्यानंतर शालेय, महाविद्यालयीन स्पर्धा, संघटनेच्या स्पर्धांना शुल्क आक
-मारोती सोनकांबळे, क्रीडाधिकारी, हिंगोली
(मारोती सोनकांबळे यांची प्रतिक्रिया अपूर्ण आहे)
फोटो