शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

गणवेश वाटप योजनेची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:19 PM

दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. मात्र मोफत गणवेश वाटपाची कामे जिल्ह्यात संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. मात्र मोफत गणवेश वाटपाची कामे जिल्ह्यात संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे.शालेय गणवेशासाठी शासनाकडून ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. परंतु सदर रक्कम अद्याप शाळास्तरावर वर्ग करण्यात आली नाही, शिवाय तसा अहवालही शिक्षणाधिकाºयाकडे सादर केलेला नाही. १५ जुलै पर्यंत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनी शाळेतील विद्यार्थी संख्या व वर्ग केलेल्या रक्कमेचा तपशिल मागविला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असल्यामुळे आता तरी गणवेश वेळेवर मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ४०० रूपये देण्याची तरतूद होती. आता यामध्ये बदल करून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत आता दोन गणवेशांसाठी ६०० रूपये लाभाची रक्कम दिली जाणार आहे. डीबीटीनुसार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. एकही लाभार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिल्या होत्या. परंतु सदर गणवेश वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालकांच्या तशा तक्रारीही आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना लवकर गणवेश तरी वाटप होतील.२०१७-१८ शैक्षणिक वर्षात गतवर्षी दिवाळी जवळ आली तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. शिवाय शिक्षण खात्याकडे गणवेश योजनेचा अहवालही वेळेत सादर करण्यात आला नाही. शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला सूचना असतात. परंतु दरवर्षी हे नियोजन बारगळते. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत २०१८-१९ मोफत गणवेश वाटप योजनेतील पात्र विद्यार्थ्याची तालुकानिहाय संख्या हिंगोली १५ हजार २५३, सेनगाव १४ हजार ३१६, वसमत १४ हजार ४६७, कळमनुरी १४ हजार ६०७ तसेच औंढा नागनाथ ११ हजार ८०२ एकूण ७० हजार ४४५ अशी आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा