शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कामे ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:52 PM

जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत विविध प्रकारच्या कामांचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास कितीतरी वर्षांचा काळ लागण्याची शक्यता असून मजूर मिळत नसल्याने मागील वर्षीपासून या योजनेत केवळ ६0 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू असलेल्या कामांपेक्षा मंजुरीनंतरही प्रलंबित कामांची संख्याच जास्त आहे.हिंगोली जिल्ह्यात या योजनेत भरघोस उद्दिष्ट मिळालेले आहे. मात्र ही कामे होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकदा ओरड होत आहे. लोकप्रतिनिधी प्रत्येक सभा, बैठकीत यावरून तोंडसुख घेत आहेत. मात्र शासन व प्रशासन दोन्हीही हलायला तयार नाहीत. आधी कामे मंजूर होत नसल्याची बोंब होती. आता मंजूर कामांचा श्रीगणेशाच होत नसल्याची बोंब आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांचीही तीच गत आहे. दहा हजार विहिरींचे उद्दिष्ट असताना ग्रामसभेतून केवळ ९९७0 लाभार्थी निवड झाली. ३९२४ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी २३८८ कामे चालू आहेत. तर पूर्ण ५४ कामे झाली आहेत. १४८२ कामे सुरूच नाहीत. व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टात ६८७ अर्ज आले. ३७३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ३ कामेच सुरू झाली आहेत. नाडेप कंपोस्टिंगची ७६८ पैकी ४६६ कामे मंजूर होती. यापैकी १५ सुरू असून २ पूर्ण झाली आहेत. शौचालयाच्या ८७२ पैकी २२६ कामांना मंजुरी दिली असताना १२0 कामेच सुरू आहेत.शौषखड्ड्यांच्या १८६९ पैकी ८८१ कामांना मंजुरी दिली होती. ४८७ कामेच सुरू झाली. समृद्ध ग्राम योजनेत ७0५ पैकी २६९ कामांना मंजुरु दिली होती. यापैकी २६१ कामे सुरू झाली आहेत.या योजनेतील कामे सुरू करण्यासाठी सूचनांवर सूचना दिल्या जात आहेत. मात्र तरीही कामे सुरू होत नाहीत. आता पावसाळ्यात काहीच कामे करणे शक्य आहे. यात फळबाग लागवडीचे १८00 चे उद्दिष्ट असून ३६२ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १४८ कामेच सुरू झाली आहेत.रोपवाटिकेच्या ६१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. यातील ४ कामे पूर्ण तर ५६ सुरू आहेत. वृक्षलागवडीच्या ३६ प्रस्तावांपैकी २३ ला मंजुरी दिली होती. यापैकी १८ कामे सुरू तर पाच कामे अजूनही सुरू झाली नाहीत.शेततळ्यांचे उद्दिष्ट ५६00 एवढे आहे. यात ५३२ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव असून ३२२ ला प्रशासकीय मंजुरी दिली. एकही काम सुरू नाही. समृद्ध गाव तलावाचा तर प्रस्तावच नाही.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना