लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पातर्गत जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात माध्यम प्रतिनीधीकरीता सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती कार्यशाळेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते.माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार हे आॅनलाईन झाले आहेत; परंतु काही विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीमुळे सायबर क्राईम जगातील अलीकडच्या वर्षात सायबर गुन्हेगारीतदेखील वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध आणण्याकरिता समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सायबर सेलचे अयुब पठान यांनी स्किमिंग स्कॅम्स, विशिंग, फिशिंग, डाटा काऊंटर फिटिंग, आयडेंटिटी थेफ्ट, ई-कॉमर्सचे प्रवाह, किरकोळ मालमत्तांचे घोटाळे, सीम डुप्लिकेशन, सोशल मिडिया आणि फेक ई-मेल यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. सायबर व्यवहार आणि इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावरही त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी पोनि मारोती थोरात पोउपनि विनायक लंबे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.आॅनलाईन फसवणुकींच्या घटनांत होतेय वाढदिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. आॅनलाईन बँकिंगद्वारे फसवणुकीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. सध्या इंटनेटचा वापर काही लोक चुकीच्या पद्धतीने करीत आहेत. त्यामुळे अनेकांची नाहक लुबाडणूक होत आहे. प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहणे व खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय आहे.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:09 AM