यंदा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीकविमा भरला आहे. जिल्ह्यातील ३.४३ लाख शेतकऱ्यांनी १ लाख ७६ हजार ६३४ हेक्टर क्षेत्र विमा काढून संरक्षित केले आहे. तर यासाठॅ १५ कोटी ४५ लाखांचे प्रिमियम विमा कंपनीकडे भरले आहे. यंदा १५ जुलैपर्यंतच गतवर्षीएवढा पीकविमा भरला गेला होता. त्यानंतर २३ जुलैची वाढीव मुदत मिळाल्याने ज्या शेतकऱ्यांचा पीकविमा भरणे बाकी होते, अशांनीही विमा भरला. दरम्यान, या काळात काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी पुढील धोका लक्षात घेता विम्याकडे कल वळविल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक पीकविमा औंढा व वसमत तालुक्यात भरण्यात आल्याचेही दिसून येत आहे.
तालुका व पीकनिहाय संरक्षित क्षेत्र
तालुका उडीद कापूस मूग तूर ज्वार सोयाबीन
औंढा २३९८ १४२८ ३०७६ २५६५ ३५६२ ३२४३२
वसमत १२९८ २०८३ २२९५ २००२ २३३७ ३६२०९
हिंगोली ५११ ५८३ ५५६ २१०१ २०९ २०२२४
कळमनुरी ६३५ ८०३ ९४१ २४७० ६७८ ३१५३३
सेनगाव ८२६ ७५७ ७०२ ३८५५ ३१० २८९७०