शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात हिंगोलीत युवासेनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:55 PM

वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरातील रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. 

हिंगोली : वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरातील रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. 

शहरात सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई सुरू आहे. विनापरवाना वाहन चालविणे, परवानगीपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहन चालविणे, विनाक्रमांकाची गाडी चालविणे, अवैध पार्किंग आदी नियमांचे उल्लंघन संदर्भात ही कारवाई सुरू आहे. आजही अशीच कारवाई ग्रामीण भागातील काही वाहनचालकांवर सुरू होती. मात्र या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी अचानक या विरोधात गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन केले. यामुळे गांधी चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

उल्लंघन करणा-यांवरच कारवाईवाहतूक शाखेची कारवाई नियमित सुरू राहणार आहे. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणा-यांवरच कारवाई केली जाते.- अशोक मैराळ, पोलीस निरीक्षक 

परीक्षार्थ्यांना अडविल्याने आंदोलन हिंगोलीत दररोजच वाहतूक शाखेतर्फे विविध कारणांनी लोकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा या शाखेला दंड वसूल करण्यात जास्त रस आहे. गांधी चौक ते अग्रसेन चौकात वाहतुकीची बेशिस्त सर्रास दिसते. यात सुधारणा केल्यास त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र याचा त्रास सध्या बारावीच्या परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांना यांतून वगळावे यासाठी आमचे आंदोलन आहे. - दिलीप घुगे, युवा सेना जिल्हाप्रमुख

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली