लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेतील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध करणारी निवेदने दिली जात आहेत. यात मराठा शिवसैनिक सेनेने जि.प. अध्यक्षांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केल्याचा आरोप करून निषेधाचे निवेदन दिले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.जिल्हा परिषदेतील राजकारणात आता बाह्यघटकांचाही शिरकाव होत आहे. मराठा मुलांवर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत. जि.प. अध्यक्षांकडून अशा बाबी अभिप्रेत नसल्याने हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करून मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. यावेळी मराठा शिवसैनिक सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पप्पू चव्हाण, हिंगोली जिल्हाप्रमुख गजानन भालेराव, सचिन पाटील मिरासे, विठ्ठल पाटील मोरे, गोपाल चव्हाण, विजय शिंदे, अविनाश चव्हाण, वैभव जाधव आदी उपस्थित होते.तर शिवसेनेच्या सदस्यांनीही जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून विविध ठराव घेवून जिल्हा परिषदेत विकास कामे होत असताना जि.प. अध्यक्षांच्या दालनात घडलेल्या या बाचाबाचीच्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला. या निवेदनावर गटनेते अंकुश आहेर, रेणूका जाधव, बाळासाहेब मगर, वैष्णवी दिलीप घुगे, गणाजी बेले, सारिका खिल्लारे, श्रीशैल्य स्वामी, रत्नमाला खंदारे, राजेंद्र शिखरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.एकंदर जिल्हा परिषदेत आज या प्रकारामुळे एकच चर्चा ऐकायला मिळाली. काहींनी हे प्रकरण निस्तारण्याची गरज असून अशा अंतर्गत वादांचा विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे समेट घडवून आणण्याची भाषा चालविली होती. परंतु अनेकांनी यावर गप्प बसणेच पसंत केले.
जिल्हा परिषद प्रकरणात निषेधांचे सत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:29 AM