शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

जि.प.त कर्मचारी कल्याण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:35 AM

जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये कर्मचारी कल्याण अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्यासह कर्मचाऱ्यांचे विविध लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी आदी लाभ दिले जाणार आहेत.हिंगोली जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या विविध विभागाच्या कर्मचा-यांच्या आस्थापनाविषयक समस्या या अभियानात सोडविण्यात येणार आहेत. ज्यांची प्रकरणे नियमित काळात सुटली नाहीत, अशांनाही यात अर्ज केल्यास आपले लाभ मिळण्यासाठी सुलभता होणार आहे. १ एप्रिल २0१८ पासून सुरू झालेले हे अभियान ३१ मेपर्यंत राबविण्यात येणार आहे. पदोन्नतीबाबत आरक्षणाचा मुद्दा सध्या वादात असल्याने खुल्या प्रवर्गातील सर्व प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. तर कालबद्ध पदोन्नतीचीही गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्वच विभागांची प्रकरणे आता मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर स्थायीत्व प्रमाणपत्र, सेवापुस्तिका अद्ययावत करणे, गोपनीय अहवाल व प्रातिनिधिक अभिलेख वर्गीकरणाची कामेही यात केली जाणार आहेत. कर्मचाºयांच्या सेवाविषयक २0 ते २५ बाबींचा यात निपटारा केला जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरण असल्यास याबाबत जि.प. कर्मचाºयांनी अर्ज करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी केले आहे. यातील अनेक बाबींचे माहिती संकलन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पदोन्नतीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद