लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवाळी सणानिमित्त शाळांना १९ दिवस सुट्यां जाहिर करण्यात आल्या होत्या. ५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शाळांना सुट्टी देण्यात आली. २५ तारखेला रविवार असल्याने २६ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू होणार आहेत.दरवर्षी प्रमाणे दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना शिक्षण विभागातर्फे सुट्या जाहिर करण्यात येतात. यावर्षीही दिवाळी सणानिमित्त विद्यार्थ्यांना सण साजरा करण्यासाठी शाळांना १९ दिवस सुट्टी जाहिर करण्यात आली होती. जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिकी शाळांना ५ ते २४ नोव्हेंबरपर्यंत शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सुट्या जाहिर केल्या. त्यामुळे २६ नोव्हेंबरपासून शाळा उघडणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी दिली. त्यामुळे आता दिवाळीच्या सुट्यांचा आनंद साजरा केल्यानंतर विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याचे आवाहनही त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले. मागील १८ ते २० दिवसांपासून शाळांना सुट्या असल्याने संबधित शाळेतील वर्ग खोल्या व परिसरातील साफसफाई करून घ्यावी, अशा सूचनाही दोन दिवसांपुर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच शाळेतील इतर सुविधेबाबतही सांगण्यात आले आहे. नियमित ठरलेल्या वेळेत दरदिवशी शाळा भरणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित यावे, यासाठी शिक्षण विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.हिंगोली : शिक्षकांना कार्यमुक्त करू नकाविषय शिक्षक समुपदेशन पदस्थापना प्रक्रिया १९ ते २० नोव्हेंबर या दोन दिवसांत पार पडली. आरटीईत उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, गणित-भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्राथमिक शिक्षकांना दर्जोन्नती देणे आवश्यक होते. ४४० शिक्षकांना पदस्थापना दिली. परंतु आता शाळा सुरू होणार असल्याने दर्जाेन्नत शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करता येणार नाही. जेथे दोन शिक्षकी शाळेत दोघांचीही दर्जोन्नती झाली असली तरी, जोपर्यंत समायोजन होणार नाही, तोपर्यंत त्यांना कार्यमुक्त करू नये अशा सूचनाही दिल्या आहेत.सूचना दिल्याशाळा सुरु झाल्यानंतर शैक्षणिक कार्यावर विपरित परिणाम होणार नाही, यासाठी विविध सूचना दिल्या आहेत. त्या पाळणे बंधनकारक असल्याचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी म्हटले.
उद्या उघडणार जि.प.च्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:40 AM