लंडन : महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेला काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतासहीत सर्व संघ लंडनमध्ये दाखल झाले आहेत. स्पर्धेपूर्वी विविध संघाच्या कर्णधारांचे एक फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी भारताच्या झेंड्यामधून अशोक चक्र गायब करण्याची घोडचूक आयोजकांनी केल्याचे समोर आले आहे.
विश्वचषकापूर्वी थेम्स नदीच्या काठी सर्व कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलावले होते. यावेळी प्रत्येक देशाच्या झेंड्याचे एक प्रतीक बनवण्यात आले होते. त्यावेळी भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्र नसल्याचे निदर्शास आले असून चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे.
आयोजकांनी सर्व देशांच्या झेंड्याचे प्रतीक थेम्सच्या नदीकाठी लावले होते. त्यावेळी सर्व कर्णधारांचा एकत्रितपणे फोटो काढण्यात आला. यावेळी विश्वचषकही तिथे ठेवण्यात आला होता. भारताच्या झेंड्यामधून अशोक चक्र गायब झाल्याची माहिती आयोजकांना दिली आहे किंवा नाही, ही बाब अजूनही समजलेली नाही.