शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेमध्ये हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’; महिला संघ चमकला, पण सुवर्ण हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:21 AM

आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा!

- ललित झांबरेजळगाव : आशियाडमध्ये हॉकीत भारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिला हॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले, मात्र ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा!गतवेळच्या विजेत्या पुरूष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र साखळी फेरीत गोलांची बरसात केल्यावर नेमक्या उपांत्य सामन्यात भारतीय पुरुषांना मलेशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ७-६ असा पराभव पत्करावा लागला. या आशियाडमधील सात सामन्यांतला भारताचा हा एकमेव पराभव, पण त्याने आपल्याला थेट कांस्यवर समाधान मानायला भाग पाडले. आशियाडच्या इतिहासात ३ सुवर्ण आणि ९ रौप्यपदकांची कमाई केलेल्या भारतीय संघ १९८६ व २०१० नंतर तिसऱ्यांदा कांस्यपदकावर मर्यादीत राहिला. यामुळे आॅलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळविण्याचीही संधी आपण गमावली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी मात देत आपण कांस्यपदक जिंकले. महिला संघानेही साखळीत गोलांची बरसात केली, मात्र अंतिम सामन्यातील जपानकडून २-१ अशा पराभवाने त्यांनीही आॅलिम्पिक थेट पात्रतेची संधी गमावली. पण अंतिम सामन्यात महिला संघाने जपानला दिलेली झुंज कौतुकास्पद होती.उपांत्य सामन्यात उशिराने मलेशियाला गोल करण्याची संधी देत भारतीय पुरुषांनी पायावर धोंडा पाडून घेतला. मलेशियाने त्यांची शैली असलेल्या जोरदार प्रति आक्रमणाचे तंत्र वापरून आपले दोन्ही गोल केले. भारताने चेंडू ताब्यात राखण्यात व समांतर पासेस देण्यात वेळ घालवला आणि कितीतरी चुका केल्या, त्याची किंमत चुकवावी लागली.त्यावर हॉकी इंडिया व भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत प्रशिक्षक हरेंद्र सिंग व त्यांच्या स्टाफला आगामी विश्वचषक ही शेवटचीे संधी असल्याचा इशारा दिला. याचवेळी पुरूष संघातील खेळाडूंचे खेळापेक्षा सोशल मिडीया व इतर बाबींकडेच अधिक लक्ष असून संघाला शिस्तीची गरज असल्याचे मत हॉकी इंडियाच्या पदाधिकाºयांनी मांडले आहे.

टॅग्स :Hockeyहॉकी