शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

अझलन शाह हॉकी : भारताची अपयशी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:47 AM

ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली.

इपोह : ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली.प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी तरुण खेळाडूंचा संघ निवडला आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या तरुण खेळाडूंनी अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी दबाव झुगारण्यात अपयश येताच अर्जेंटिनाने बाजी मारली. मुख्य खेळाडू आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, मनप्रीत सिंग आणि गोलकीपर पीआर श्रीजेश हे संघात नाहीत, तर ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनादेखील विश्रांत देण्यात आली आहे.अर्जेंटिनाचा ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने अखेर गोलकोंडी फोडली. १३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत पेयाटने आघाडी मिळवून दिली. यानंतर २४ व्या मिनिटाला गोंझालोने पुन्हा एकदा चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत आघाडी २-० अशी केली. दुसरीकडे भारतीय खेळाडू गोलची संधी निर्माण करण्यात अपयशी ठरत होते. दुसºया सत्राच्या अखेरीस भारताला लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाल्या. युवा ड्रॅगफ्लिकर अमित रोहिदासने २६ व्या मिनिटाला गोलकीपर विवाल्डीचा बचाव भेदत उजव्या कोपºयातून चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला. अमित रोहिदासच्या गोलमध्ये भारत चांगली लढत देईल, असे चित्र निर्माण झाले. मध्यंतरानंतर तिसºया सत्रात अमित रोहिदासने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत २-२ अशी बरोबरी साधून दिली. मात्र गोंझालो पेयाटने अमितपाठोपाठ दुसºया मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. गोंझालोचा तिसरा गोल निर्णायक ठरला. अखेरच्या सत्रात पावसामुळे सामना काही काळ थांबविण्यात आला. मात्र मोक्याच्या क्षणी दडपणाखाली भारतीयांचा खेळ बहरलाच नाही. तरुण खेळाडूंव्यतिरिक्त एकाही अनुभवी खेळाडूने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या नाहीत. उद्या भारताची लढत इंग्लंडविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)विवाल्डीचा सुरेख बचावपहिल्या सत्रात भारताच्या तरुण खेळाडूंनी अनपेक्षितरीत्या आक्रमक खेळ करीत अर्जेंटिनाच्या खेळाडूंना चांगलेच पेचात पाडले. नवोदित सुमित कुमार, तलविंदर सिंग, नीलम सेस यांनी काही चांगल्या मूव्ह करीत अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर हल्ले वारंवार केले.मात्र अनुभवी गोलकीपर विवाल्डीने भारताचे सर्व हल्ले थोपवून लावले. त्यातच पहिल्या सत्रात अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी बचावात क्षुल्लक चुका करीत भारतीय खेळाडूंना वरचढ होण्याचीही संधी दिली, मात्र सुदैवाने गोलकीपर विवाल्डीने अर्जेंटिनाचा गोलपोस्ट सुरक्षित ठेवला.

टॅग्स :Hockeyहॉकी