शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

बत्रा, मेहता यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:17 AM

भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणाºया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच विद्यमान महासचिव राजीव मेहता यांची पुन्हा दुसºया कार्यकाळासाठी या पदावर निवड होईल.चार वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदावर बत्रा यांच्या नावाची निवड होण्याची औपचारिकता गुरुवारी पार पडेल. मात्र प्रक्रियानुसार बत्रा यांना या पदासाठी अखिल भारतीय टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांच्याविरुद्ध निवडणूक लढवावी लागेल. खन्ना यांनी वेळेची मर्यादा ओलांडल्यानंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले होते. खन्ना यांनी निर्धारित ३ डिसेंबरपर्यंत आपले नाव मागे घेतले नव्हते. परंतु, ७ डिसेंबरला त्यांनी निवडणूक आयोगाला निवडणूक लढणार नसल्याचे कळवले व अध्यक्षपदासाठी आपले समर्थन बत्रा यांना असेल, असेही सांगितले होते. ‘आयओए’ परिवाराला एकत्रित ठेवण्यासाठी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याची भूमिका खन्ना यांनी घेतली.याआधी या निवडणुकीमध्ये बत्रा यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, निवडणूक अधिकारी एस. के. मेंदीरत्ता यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये निवडण्यात आलेल्या कार्यकारी परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य अध्यक्षपद आणि महासचिव पदासाठी निवडणूक लढवू शकतात, असे स्पष्ट केले. यानंतर बत्रा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ‘आयओए’ने आपल्या विशेष बैठकीत सर्वसंमतीनुसार २०१२ व २०१४ साली निवडून आलेल्या पदाधिकाºयांना व कार्यकारी परिषदेच्या सदस्यांना यंदाच्या निवडणुकीत लढण्याची परवानगी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी