गोल्ड कोस्ट - गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी सकाळी मलेशियाविरुद्ध झालेल्या लढतीत हरमनप्रीत सिंगने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमधील तिसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंहने गोल करून भारताला लढतीती 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली. मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलचा फैजल सारीने गोल करून मलेशियाला बरोबरी साधून दिली. मात्र हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा कमाल करताना पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी दुसरा गोल केला आणि भारतीय संघाला ही आघाडी मिळवून दिली. अखेरीस ही लढत भारताने 2-1 अशा गोलफरकाने जिंकली. या लढतीत भारताला एकूण पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यातील केवळ दोन पेनल्टी कॉर्नरवर भारताला गोल करता आले.
Commonwealth Games 2018 : हरमनप्रीत चमकला, मलेशियाला नमवून भारत हॉकीच्या उपांत्यफेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 9:08 AM