गोल्ड कोस्ट - गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये असलेला भारतीय महिला हॉकी संघ २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेल्सविरोधात आपल्या अभियानाला सुरूवात करणार आहे. २००६ नंतर पहिल्यांदा पदक पटकावण्याच्या उद्देशाने भारतीय संघ खेळणार आहे.गेल्या वेळी पाचव्या स्थानावर राहिलेल्या भारतीय हॉकी संघाने २००६ च्या मेलबर्न स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. त्या आधी २००२ मध्ये मँचेस्टरला इंग्लंडला पराभूत करत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.गेल्या वर्षी आशियाई चषक जिंकल्यानंतर दक्षिण कोरिया दौऱ्यात मालिका पटकावल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे. ‘पूल ए’मध्ये त्याचा सामना जगातील दुसºया क्रमांकाच्या टीम इंग्लंड आणि आफ्रिकन चॅम्पियन द. आफ्रिकेसोबत होणार आहे.जागतिक क्रमवारीमध्ये दहाव्या स्थानावर असणा-या भारताने रिओ आॅलिम्पिक स्पर्धेनंतर अनेक सुधारणा केल्या. गेल्या वर्षी भारतीय महिलांनी जापानमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये चीनला अंतिम सामन्यात शुटआऊटमध्ये ५-४ ने पराभूत करत दुसºयांना सुवर्ण पदक पटकावले होते.प्रशिक्षक हरेंद्र सिंह म्हणाले की, ‘आमचे खेळाडू ब-याच काळापासून एकत्र आहेत. संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. त्यांचा ताळमेळ देखील योग्य आहे आणि हे आशिया चषकात दिसले. राष्ट्रकुल स्पर्धेत काही चांगले निकाल देत आम्ही पदक जिंकू.’
Commonwealth Games 2018 : बारा वर्षांनंतर भारताला महिला हॉकीत पदकाची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 2:08 AM