कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे अनेकांना परदेशात अडकून रहावे लागले आहे. . भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या हॉकी संघातील खेळाडू अशोक दिवान लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे आणि परदेशातील बिकट होत चाललेली परिस्थिती पाहता त्यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याकडे मदत मागितली आहे.
दिवान यांनी बत्रा यांना पत्र लिहिले आणि त्यात म्हटले की,''मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी अमेरिकेत अडकलो आहे आणि माझी प्रकृतीही ठिक नाही. रक्तदाबाच्या समस्येमुळे मला गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. माझे परतीचे तिकिटही रद्द झाले. माझा येथे कोणताही इन्श्युरन्स नाही आणि त्यामुळे येथील खर्च उचलणे मला महागात पडत आहे.''
''क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि केंद्रीय परदेश मंत्री एस जयशंकर यांनाही मी विनंती करतो. त्यांनी सॅन फ्रँसिस्को येथील भारतीय दुतावासाशी बोलून मला भारतात पाठवण्याची सोय करावी. भारतात परतल्यानंतर मी हॉस्पिटल्सचे सर्व बिल भरेन. कृपया परिस्थितीची गंभीरता ओळखा, माझी अवस्था बिकट होत चालली आहे,'' असेही त्यांनी लिहीले.
दिवान यांची कन्या आरुषीनं पीटीआयला सांगितले की,''माझे वडील डिसेंबरमध्ये अमेरिकेत गेले होते आणि 20 एप्रिलला ते परत येणार होते. अमेरिकेत काम करणाऱ्या माझ्या भावाला भेटण्यासाठी ते तेथे गेले होते. पण, अचानक ते आजारी पडले. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. डॉक्टरांनी त्यांना एका महिन्याची औषधं दिली आहेत, परंतु त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही.''
भारतानं 1975मध्ये हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता आणि दिवान हे त्या संघातील सदस्य होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!
भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...
युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल
भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी क्रमांका'मागची मजेशीर गोष्ट...
Corona Virus : ... तर भारताचे हे उपकार पाकिस्तान कधीच विसरणार नाही, शोएब अख्तर
अमित मिश्रा, मिताली राज यांचा गरजूंसाठी पुढाकार; करतायत अन्नदान
भारताला पैशांची गरज नाही, खेळाडूंच्या जीवाशी का खेळायचं? कपिल देव यांनी अख्तरला फटकारलं