मुंबईला जोरदार पावसानं पुन्हा एकदा झोडपले आहे. मंगळवारपाठोपाठ बुधवारीही पावसाचा जोर कामय असल्यानं अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक आहे. तेथे सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी अडीच-तीन फुट पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सामान्यांप्रमाणे भारताच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा या साचलेल्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देविंदर वाल्मिकीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मुंबई महानगर पालिका आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आहे. 2016मध्ये आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. शिवाय त्याचवर्षी भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्यपदकही जिंकले होते. सध्या देविंदर भारतीय संघाबाहेर असला तरी तो नेदरलँड येथील लीगमध्ये खेळतो.
देविंदरनं ट्विट केलं की,''मुंबई महानगर पालिका, आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की, माझ्या कुटुंबीयांना मदत करा. मरीन लाईन्स येथील आमच्या घरी पाणी शिरलं आहे. माझ्या कुटुंबीतील सदस्य स्थानिक वॉर्ड ऑफिसमध्ये गेले होते, परंतु कुणीच यायला तयार नाही. मी हॉकी सामन्यासाठी नेदरलँड्स येथे आहे.''
देविंदरनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत घरातून पाणी बाहेर काढणारा दिसणारा व्यक्ती त्याचा भाऊ युवराज आहे. युवराजही भारताचा हॉकीपटू आहे आणि 2011च्या आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेत त्यानं केलेल्या गोलनं भारताला पाकिस्तानवर विजय मिळवून दिला होता. ती स्पर्धा भारतानं जिंकली होती.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली
भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं
अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल
आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात
'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी
... जे स्वीकारू शकत नाही, ते बदला; शोएब अख्तरच्या ट्विटनं नेटिझन्स खवळले