हिरोशिमा : कर्णधार राणी रामपाल हिच्या गोलनंतर ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली. भारतीय महिला संघाने हिरोशिमा हॉकी स्टेडियममध्ये आशियाई चॅम्पियनवर शानदार विजय मिळवला.कर्णधार राणीने तिसऱ्या मिनिटालाच भारताला आघाडी मिळवून दिली; परंतु कानोन मोरी हिने जपानसाठी ११ व्या मिनिटाला गोल करीत बरोबरी साधून दिली. त्यानंतर गुरजितने ४५ आणि ६० व्या मिनिटाला गोल करीत संघाचा विजय निश्चित केला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याआधीच २०२० आॅलिम्पिक पात्रतेच्या अखेरच्या फेरीसाठी पात्रता मिळवली होती. या स्पर्धेत राणी सर्वोत्तम खेळाडूची मानकरी ठरली, तर गुरजित सर्वाधिक गोल करणारी खेळाडूची मानकरी ठरली. भारतीय कर्णधाराने जपानची गोलरक्षक अकियो टनाका हिला चकवताना गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने वर्चस्व राखताना नवव्या मिनिटाला दुसरा पेनॉल्टी कॉर्नर मिळवला; परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकलेनाही.दरम्यान, जपान संघाने पहिल्या १५ मिनिटांत फक्त दोनदाच भारतीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. दुसऱ्यांदा जेव्हा संघ भारतीय क्षेत्रामध्ये पोहोचला तेव्हा जपानी फॉरवर्ड आघाडी फळीने गोल करीत बरोबरी साधली. कानोन मोरीच्या डेफ्लिेक्शन फटक्याचा भारतीय गोलरक्षक सविता बचाव करू शकली नाही. दुसºया क्वॉर्टरमध्ये वंदना कटारियाने १८ व्या मिनिटाला गोल करण्याची मिळालेली सुरेख संधी गमावली. त्यानंतर जपानने गोल करण्याची अनेकदा संधी निर्माण केली; परंतु त्यांचेप्रयत्न भारतीय बचावफळीने अपयशी ठरवले.भारताला तिसºया क्वॉर्टरमध्ये आणखी एक पेनॉल्टी कॉर्नर मिळाला. ड्रॅग फ्लिकर गुरजित पुन्हा संघासाठी तारणहार ठरली. तिने गोल करीत संघाची आघाडी २-१ अशी केली. चौथ्या क्वॉर्टरच्या अखेरच्या मिनिटाला गुरजितने पेनॉल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करीत भारताच्याविजयावर ३-१ गोलने शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)अप्रतिम खेळ आणि शानदार निकाल. महिला एफआयएच सिरिज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकल्याबद्दल आपल्या संघाचे अभिनंद. हा विजय हॉकीला आणखी लोकप्रिय बनवेल. त्याचप्रमाणे अनेक मुलींना या खेळामध्ये शानदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
एफआयएच सिरीज फायनल्स : भारतीय महिला हॉकी संघाचे शानदार जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 3:53 AM