लंडन : पहिल्या सत्रात केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर आयर्लंडने भारतावर 1-0 असा विजय मिळवला. आयर्लंडसारख्या भारतालाही बऱ्याच संधी मिळाल्या, पण भारताला एकाही संधीचे सोने करता आले नाही. या स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला तरी त्यांना बाद फेरीत पोहोचता येऊ शकते. त्यामुळे आता तिसऱ्या अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
इंग्लंडविरुद्धची लढत भारतीय संघाने जिंकता जिंकता बरोबरीत सोडवली होती. या सामन्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्धचा सामना सहज जिंकेल, असे भाकित करण्यात आले होते. पण आयर्लंडने सामन्याच्या 12व्या मिनिटाला गोल करत भारताला मोठा धक्का दिला.
सामन्याच्या बाराव्या मिनिटाला आयर्लंडला पेनेल्टी कॉर्नर मिळाला होता. या कॉर्नरवर अॅना ओ' फ्लॅनगनने गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.