नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाचे माजी कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी बुधवारी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. याची घोषणा खुद्द ओल्टमन्स यांनीच केली. त्यांच्या मते, हा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल.ओल्टमन्स यांनी भारतीय पुरुष हॉकी संघासोबत ४ वर्षे काम केले. आधी ते भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक होते. २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ते मुख्य कोच म्हणून कार्यरत राहिले. त्यांची अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. ओल्टमन्स यांनी टिष्ट्वट करून स्वत:च्या नियुक्तीची माहिती दिली. तथापि, पाकिस्तान हॉकी फेडरेशनने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. ओल्टमन्स म्हणाले, ‘‘आजपासून अडीच वर्षे पीएचएफसोबत कोच म्हणून करारबद्ध झाल्याचे सांगताना मला आनंद वाटतो.’’ ओल्टमन्स दुसºयांदा पाक हॉकी संघाचे कोच बनले आहेत. याआधी २००३-०४च्या सत्रातअथेन्स आॅलिम्पिकपर्यंत ते पाकचे कोच होते. (वृत्तसंस्था)‘ओल्टमन्स यांना राष्टÑीय हॉकी संघाचे कोच नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात संघ राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाड आणि विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. आम्ही त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. मागच्या महिन्यात संघाच्या ओमान दौºयाच्या वेळी ओल्टमन्स तेथे आले होते.’- मोहम्मद खालेद खोखर,अध्यक्ष पीएचएफ
भारताचे माजी हॉकी कोच ओल्टमन्स पाकच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:10 AM