कराची, दि. 22 - पाकिस्तानच्या खेळाडूंना भारत सरकारने वेळेत व्हिसा आणि त्यांच्या सुरक्षेची हमी दिली, तरच भारतात होणा-या आगामी हॉकी विश्वचषकासाठी भाग घेऊ, अन्यथा हॉकी विश्वचषकावर बहिष्कार घालू अशी धमकी पाकिस्तान हॉकी महासंघाने दिली आहे. पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष खालिद खोकर यांनी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आंतराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांची दुबईत भेट घेतली. या भेटीनंतर खालिद खोकर म्हणाले की, आम्ही आमच्या काही समस्या नरेंद्र बत्रा यांच्यासमोर मांडल्या आहेत. भारतात पुढील वर्षी होणा-या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाला सुरक्षा आणि व्हिसा नाही मिळाला, तर पाकिस्तानचा संघ या विश्वचषकात भाग घेणार नाही. तसेच, यावर बहिष्कार घालण्यात येईल, असे खालिद खोकर यांनी सांगितले. पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा आणि योग्य वेळत व्हिसा मिळण्यासाठी पाकिस्तान हॉकी महासंघ गेले कित्येक महिने प्रयत्न करत आहे. तसेच, याआधी भारतात झालेल्या महत्वाच्या स्पर्धांसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी व्हिसा मंजूर केला नाही, असेही खालिद खोकर यांनी सांगितले. 2018 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी इंग्लंड आणि भारताला मिळाली आहे. या विश्वचषकामध्ये अन्य संघासोबतच पाकिस्तानचा संघ पात्र ठरला आहे. 16 संघांमध्ये रंगणारी ही स्पर्धा 1 ते 16 डिसेंबरदरम्यान होणार आहे.
खेळाडूंच्या सुरक्षतेची हमी द्या, अन्यथा भारतातील हॉकी विश्वचषकावर बहिष्कार घालू - पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 7:06 PM
पाकिस्तानच्या खेळाडूंना भारत सरकारने वेळेत व्हिसा आणि त्यांच्या सुरक्षेची हमी दिली, तरच भारतात होणा-या आगामी हॉकी विश्वचषकासाठी भाग घेऊ, अन्यथा हॉकी विश्वचषकावर बहिष्कार घालू अशी धमकी पाकिस्तान हॉकी महासंघाने दिली आहे.
ठळक मुद्देव्हिसा आणि त्यांच्या सुरक्षेची हमी द्याअन्यथा हॉकी विश्वचषकावर बहिष्कार घालू 2018 मध्ये होणार हॉकी विश्वचषक