नवी दिल्ली : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा २३ सदस्यांचा पुरुष हॉकी संघ जाहीर झाला असून अनुभवी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मंगळवारी हॉकी इंडियाने संघाची घोषणा केली. २६ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ॲडलेड येथे सुरू होणाऱ्या या दौऱ्यातून पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी कसून सराव करेल. भुवनेश्वर आणि राउरकेला येथे १३ ते २९ जानेवारीदरम्यान हॉकी विश्वचषक स्पर्धेची चुरस रंगणार आहे. अमित रोहिदास याच्याकडे भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पुरुष हॉकी संघगोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक, पी. आर. श्रीजेश बचावपटू : वरूण कुमार, जरमनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, मनदीप मोर आणि नीलम संजीप सेस.मध्यरक्षक : गुरजंत सिंग, आकाशदीप सिंग, मोहम्मद रहील मौसीन, राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, शमशेर सिंग, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग आणि सुमित.आक्रमक : मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक आणि सुखजीत सिंग.