शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

हॉकी मालिका, भारताची न्यूझीलंडवर ४-२ गोलने मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 2:15 AM

भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघावर ४-२ गोलने दणदणीत विजय मिळवला.

बंगळुरू : भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघावर ४-२ गोलने दणदणीत विजय मिळवला.भारतासाठी रूपिंदरपाल सिंग याने दुसऱ्या आणि ३४ व्या मिनिटाला, असे दोन गोल केले. मनदीपसिंहने १५ व्या आणि हरमनप्रीतसिंह याने ३८ व्या मिनिटाला गोल केले. न्यूझीलंडकडून स्टीफन जेनेस याने २६ व्या आणि ५५ व्या मिनिटाला गोल केला.भारताला सुरुवातीच्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नर मिळाला. रूपिंदरने या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत भारताला आघाडी मिळवून दिली. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेनंतर संघात पुनरागमन करणाºया रूपिंदरचा फटका न्यूझीलंडचा गोलरक्षक रिचर्ड जायस रोखू शकला नाही.न्यूझीलंडला सातव्या मिनिटाला बरोबरीची संधी मिळाली; परंतु भारतीय गोलरक्षक कृष्ण पाठकने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर मनप्रीतसिंहच्या क्रॉसवर मनदीपने १५ व्या मिनिटाला गोल करीत भारताची आघाडी दुप्पट केली. दुसºया क्वॉर्टरमध्ये न्यूझीलंडने डिफेन्स मजबूत केला. भारताला २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर मात्र गोल होऊ शकला नाही.न्यूझीलंडसाठी २६ व्या मिनिटाला जेनेसने पहिला गोल केला. पूर्वार्धानंतर भारताने आक्रमण आणखी धारदार केले. फॉरवर्ड एस.व्ही. सुनीलने भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला आणि त्याचे रूपिंदरने गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर ३८ व्या मिनिटाला सुनील भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. त्यावर हरमनप्रीतने भारताचा चौथा गोल नोंदवला.अखेरच्या क्वॉर्टरमध्ये न्यूझीलंड संघाने सातत्याने हल्ले करत भारताला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला व जेनेसने दुसरा गोल केला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु त्यावर वूडस् गोल करू शकला नाही. त्यानंतर पुन्हा किवी संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु सूरज करकेरा याने त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरवले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Hockeyहॉकी