भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: उत्कंठावर्धक झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडने अर्जेंटीनावर ३-२ असा विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता.
दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. अर्जेंटीनाकडून गोंझालो पेइलाटने १७व्या मिनिटाला पहिला गोल केला. अर्जेंटीनाला हा आनंद जास्त काळ टिकवता आला नाही. कारण इंग्लंडच्या बॅरी मिडलटनने सामन्याच्या २७व्या मिनिटाला गोल केला, त्यामुळे हे सत्र बरोबरीत राहिले.
तिसऱ्या सत्रात इंग्लंडच्या विल कॅलनलने सामन्याच्या ४५व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
चौथे आणि निर्णायक सत्र चांगलेच रंगतदार ठरले. कारण अर्जेंटीनाकडून गोंझालो पेइलाटनेच ४८व्या मिनिटाला दुसरा गोल केला आणि संघाला २-२ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर दोन्ही संघांकडून जोरदार आक्रमणे झाली. पण या आक्रमणांमध्ये इंग्लंडला यश आले. इंग्लंडच्या हॅरी मार्टीनने ४९व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडने असे केले सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ