ओडिशा, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्याने हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन झाले. उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरी दिक्षीत, शाहरुख खान यांसह काही बॉलीवूडच्या कलाकारांनी आपल्या अदाकारीने हा सोहळा अविस्मरणीय केला.
उद्घाटन सोहळ्यातील एक सुंदर दृश्य
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने केली दिमाखात एंट्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा
ड्रोनच्या सहाय्याने या सोहळ्यात केलेली अदाकारी पाहायला हवी
माधुरीने आपल्या कलाविष्काराने साऱ्यांना घायाळ केले
हॉकी वर्ल्डकपमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. हॉकी वर्ल्डकपमध्ये उद्यापासून सुरु होणारे सामने 16 डिसेंबरपर्यंत खेळविले जाणार आहेत. 16 संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आले आहे. भारतीय संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश आहे, तर पाकिस्तान संघाचा डी ग्रुपमध्ये समावेश आहे. हॉकी वर्ल्डकपमध्ये 28 नोव्हेंबरला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचे नेतृत्व खेळाडू मनप्रित सिंग करणार आहे.