भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताचे हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. नेदरलँड्सला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने १५ डिसेंबरला होणार आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यामध्ये होणार आहे.
चौथ्या सत्रामध्ये नेदरलँड्सच्या मिंक व्हॅन डर विर्नेडने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि त्यांनी २-१ अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघांकडून बऱ्याच चुका झाल्या. त्यामुळे हे सत्रदेखील गोलरहीतच राहिले.
दुसऱ्या सत्रामध्ये भारताकडे जास्त वेळ चेंडूचा ताबा होता, पण त्यांना गोल करण्यात मात्र अपयश आले.
भारताच्या अक्षदीप सिंगने सामन्याच्या १२व्या मिनिटाला पेलेन्टी कॉर्नरवर गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिला. पण हा आनंद भारताला जास्त काळ टिकवता आला नाही. नेदरलँड्सच्या थिइरी ब्रिंकमनने १५व्या मिनिटाला गोल केला आणि त्यांनी भारताबरोबर १-१ अशी बरोबरी केली.