नवी दिल्ली : यजमान भारताची हॉकी विश्व लीगच्या फायनलमध्ये पहिली लढत आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. १ ते १० डिसेंबर या कालावधीत भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये सामने रंगणार आहेत. विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया तसेच आॅलिम्पिक कांस्यविजेत्या जर्मनी संघासोबत भारताला ब गटात स्थान देण्यात आले आहे.आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाने गुरुवारी स्पर्धेचे वेळात्रक जाहीर केले. त्यानुसार ब गटात भारतासह जर्मनी, आॅस्ट्रेलिया आणि युरो नेशन्सचा कांस्यविजेता इंग्लंडचा समावेश आहे. ‘अ’ गटात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना, युरोपियन चॅम्पियन नेदरलँड्स, आॅलिम्पिक रौप्यविजेता बेल्यिजम तसेच स्पेन हे संघ आहेत.स्पर्धेची सुरुवात जर्मनी-इंग्लंड सामन्याने होईल. दुसºया दिवशी भारत- आॅस्ट्रेलिया परस्परांपुढे उभे राहतील. त्यानंतर २ डिसेंबर रोजी भारताला इंग्लंडविरुद्ध आणि ४ डिसेंबर रोजी जर्मनीविरुद्ध खेळावे लागेल.साखळी सामने १ ते ५ डिसेंबर या कालावधीत होतील. त्यानंतर ६आणि ७ डिसेंबरला उपांत्यपूर्व सामने, ८ आणि ९ ला उपांत्य तसेच स्थान निश्चित करणाºया सामन्यांचे आयोजन होईल. (वृत्तसंस्था)१० डिसेंबर रोजी सकाळी कांस्यपदकासाठी, तर दुपारी सुवर्णपदकासाठी सामना खेळविला जाणार आहे.विश्व हॉकी लीगचे वेळापत्रक-१ डिसेंबर : अ गट : जर्मनी विरुद्ध इंग्लंड(दुपारी ४.४५) ब गट : आॅस्ट्रेलिया विरुद्धभारत (सायंकाळी ७.३०)२ डिसेंबर : अ गट : नेदरलँड्स विरुद्ध स्पेन (दुपारी २) ब गट : जर्मनी विरुद्ध आॅस्ट्रेलिया (सायंकाळी ७.३०) ब गट : भारत विरुद्ध इंग्लंड (सायंकाळी ७.३०)३ डिसेंबर : अ गट : बेल्जियम विरुद्ध स्पेन(सायंकाळी ७.३०) अ गट : नेदरलँड्स विरुद्ध अर्जेंटिना (सायंकाळी ७.३०)४ डिसेंबर : ब गट : आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (सायंकाळी ५.३०) ब गट : भारत विरुद्ध जर्मनी (सायंकाळी ७.३०)५ डिसेंबर : अ गट : अर्जेंटिना विरुद्ध स्पेन (सायंकाळी ५.३०) अ गट : बेल्जियम विरुद्ध नेदरलँड्स (सायंकाळी ७.३०)६ डिसेंबर : उपांत्यपूर्व सामने फायनल (५.१५ पासून) आणि (७.३० पासून)७ डिसेंबर : उपांत्यपूर्व सामने (५.१५ पासून) आणि (७.३० पासून)८ डिसेंबर : स्थान निश्चित करणारे सामने (५.१५ पासून) उपांत्य सामना (७.३० पासून),९ डिसेंबर: स्थान निश्चित करणारे सामने(५.१५), उपांत्य सामना (७.३० पासून),१० डिसेंंबर : कांस्यपदकाचा सामना (५.१५ पासून), अंतिम सामना(७.३० पासून).
हॉकी विश्व लीगच्या फायनल: आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:39 AM