शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं जर्मनीचा 2-1नं पराभव करत मिळवलं कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 7:34 PM

भुवनेश्वर- हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं जर्मनीचा 2-1नं पराभव करत कांस्यपदकावर पुन्हा एकदा नाव कोरलं आहे.

भुवनेश्वर : हॉकी विश्व लीग स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीयांनी कांस्य पदकाच्या निर्णायक लढतीत जर्मनीचा 2-1 असा पाडाव करत बाजी मारली. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांनी भारतीय संघाला प्रोत्साहन द्यायला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या जोरावरच भारतीय खेळाडूंनी कांस्यपदक निसटू दिले नाही.एस. व्ही. सुनील (21वे मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (54) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचे कांस्य पदक निश्चित करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी मार्क अ‍ॅपेल याने जर्मनीचा एकमेव गोल साकारला. विशेष म्हणजे मार्क या सामन्यात गोलरक्षक ऐवजी मध्यक्रम फळीमध्ये खेळत होता. दरम्यान, खेळाडूंच्या दुखापतीमुळे जर्मनीने या सामन्यात आपल्या अनेक राखीव खेळाडूंना मैदानात उतरवले होते.रायपूर येथे झालेल्या गतस्पर्धेतही भारताने कांस्य पदक पटकावले होते. यंदा मात्र भारताला पदकाचा रंग बदलण्याची नामी संधी होती. परंतु, उपांत्य सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या निसटत्या पराभवामुळे यजमानांना पुन्हा एकदा कांस्य पदकाच्या लढतीत खेळावे लागले. या सामन्यात जर्मनीने 7 पेनल्टी कॉर्नर मिळवले खरे, परंतु त्यावर एकही गोल करण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान साखळी सामन्यात जर्मनीने भारताला 2-0 असा धक्का दिला होता. या पराभवाचा वचपाही यावेळी भारताने काढला. आक्रमक सुरुवात केलेल्या जर्मनीने दोन्ही क्वार्टरमध्ये एकूण सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र भारतीयांनी आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर त्यांना यश मिळवू दिले नाही. यानंतर भारताने आक्रमक चाल रचली आणि गोलक्षेत्रामध्ये सुनीलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत अप्रतिम गोल करत भारताला आघाडीवर नेले. त्याचवेळी पेनल्टी कॉर्नरची संधी दडवण्याची जर्मनीची मालिका कायम राहिल्याने त्यांच्यावरचे दडपण स्पष्ट जाणवू लागले होते. त्याचवेळी पाच मिनिटांनंतर सुमित आणि आकाशदीप यांच्याकडून मिळालेल्या पासवर गोल करण्यात सुनील अपयशी ठरल्याने भारताची आघाडी आणखी वाढली नाही.मध्यंतराला 1-0 असे नियंत्रण राखलेल्या भारताने दुस-या सत्रात आक्रमक खेळ केला. यावेळी दुस-या सत्राच्या तिस-याच मिनिटाला आकाशदीपने जर्मन गोलपोस्टवर हल्ला केला, परंतु त्याचा फटका गोलरक्षक तोबियास बॉल्टर याने अडवला. यानंतर तिस-या मिनिटाला अ‍ॅपेलने महत्त्वपूर्ण गोल करत जर्मनीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या दरम्यान डॅन अँगुयेन याला ग्रीनकार्ड दाखविल्याने जर्मनीला 9 खेळाडूंसह खेळावे लागले. चौथ्या सत्रापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने जबरदस्त खेळ करताना दोन मिनिटांमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि त्यातील अखेरच्या पेनल्टी कॉर्नर हरमनप्रीतने निर्णायक गोल करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

टॅग्स :Hockeyहॉकी