शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विश्वकप हॉकी स्पर्धेसाठी संघ जाहीर, भारतीय संघातून रुपिंदर, सुनील यांना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 2:42 AM

मनप्रित सिंग २८ नोव्हेंबरपासून भुवनेश्वरमध्ये प्रारंभ होत असलेल्या एफआयएच विश्वकप स्पर्धेत भारताच्या १८ सदस्यांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

नवी दिल्ली : मनप्रित सिंग २८ नोव्हेंबरपासून भुवनेश्वरमध्ये प्रारंभ होत असलेल्या एफआयएच विश्वकप स्पर्धेत भारताच्या १८ सदस्यांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या हॉकी संघात अनुभवी रुपिंदर पालसिंग आणि एस.व्ही. सुनील यांना संधी मिळालेली नाही. अनुभवी स्ट्रायकर सुनीलला राष्ट्रीय शिबिरादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याच्या खेळण्याबाबत साशंकता होती. गेल्या महिन्यात मस्कटमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी ही दुखापत झाली होती. रुपिंदर पालकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. सुनील या स्पर्धेत खेळला नव्हता. स्पर्धेत पावसामुळे अंतिम लढत शक्य न झाल्याने भारत आणि पाकिस्तान संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.भारतीय संघगोलकिपर : पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. डिफेंडर : हरमनप्रीत सिंग, बीरेंद्र लाकडा, वरुण कुमार, कोथाजित सिंग खादांगबम, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास. मिडफिल्डर : मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग खांगजुम (उपकर्णधार), निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, सुमित. फॉरवर्ड : आकाशदीप सिंग, मंदीप सिंग, दिलप्रित सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजित सिंग.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत