भुवनेश्वर : यजमान भारताने हॉकी विश्वचषक स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करताना ‘क’ गटातील पहिल्या सामन्यात तुलनेत दुबळ्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा ५-० असा धुव्वा उडवला. युवा खेळाडूंचा भरणा अधिक असलेल्या भारतीय संघासाठी हा सामना चांगला सराव ठरला. सामन्यात दोन गोल केलेल्या सिमरनजीत सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावर भारताने एकहाती वर्चस्व राखताना दोन संघांतील फरक स्पष्ट केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या यजमानांनी दक्षिण आफ्रिकेला आपला खेळ करण्याची एकही संधी दिली नाही. विशेष म्हणजे सिमरनजीत सिंग याने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी मनदीप सिंग, आकाशदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
भारतीयांच्या तुफान आक्रमणापुढे दुबळ्या दक्षिण आफ्रिकेचा काहीच निभाव लागला नाही. घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या मोठ्या पाठिंब्यासह खेळताना भारतीयांनी दक्षिण आफ्रिकेला हॉकीचे धडेच दिले. मनदीप सिंग याने १०व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल नोंदवताना भारतीय संघाला आघाडीवर नेले. यानंतर आकाशदीप सिंग याने १२व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी केली. मध्यांतरापर्यंत भारताने हीच आघाडी कायम राखत सामन्यावर वर्चस्व राखल.बेल्जियमला विजयासाठी कॅनडाने झुंजविलेआॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने विश्वचषक हॉकी स्पर्धेची विजयी सुरुवात करताना कॅनडाचा २-१ असा पराभव केला. बुधवारी झालेल्या या सामन्यात बेल्जियमचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु कॅनडाने जबरदस्त झुंज देताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियमला विजयासाठी घाम गाळण्यास भाग पाडले. जबरदस्त सुरुवात केलेल्या बेल्जियमने पहिल्या क्वार्टरमध्ये तुफानी आक्रमण करताना कॅनडावर दबाव टाकला. मात्र, त्यांना आपल्या खेळामध्ये सातत्य राखता आले नाही. तिसºयाच मिनिटाला फेलिक्स डेनायेरने गोल करत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. यानंतर कर्णधार थॉमस ब्रियेल्सने १२व्या मिनिटाला गोल केला, परंतु या गोलविरुद्ध कॅनडाने रेफरल घेतला. कारण, गोलजाळ्यात जाण्याआधीच चेंडू थॉमसच्या हाताला लागला होता.२२व्या मिनिटाला पुन्हा एकदा थॉमसने आर्थर वॅन डोरेनच्या मूव्हवर संघाचा दुसरा गोल केला. या जोरावर बेल्जियमने मध्यांतराला २-० अशी पकड मिळवली. यानंतर कॅनडाने सर्वांनाच चकित करताना जोरदार प्रत्युत्तर देत पुनरागमन केले. अनुभवी मार्क पीयरसनने ४८ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत कॅनडाची पिछाडी १-२ अशी कमी केली. मात्र, बेल्जियमने अखेरपर्यंत पकड सोडली नाही.