शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

भारतीय हॉकी संघाचा धडाका; आॅस्ट्रेलिया ‘अ’वर पुन्हा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 3:40 AM

संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे.

पर्थ - संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे.जखमी झाल्यानंतर आठ महिन्यांनी स्पर्धात्मक हॉकीत परतलेला ड्रॅक फ्लिकर रुपिंदरने सहाव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. यानंतर सुमितने १२ व्या तसेच १३ व्या मिनिटाला पाठोपाठ गोल नोंदविताच यजमान संघ बॅकफूटवर आला. भारतीय आक्रमक फळीने पहिल्या क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजवून सातत्याने प्रतिस्पर्धी गोलफळीवर हल्ले चढविले. डावपेच फळाला आल्याने तिन्ही गोल पहिल्याच क्वार्टरमध्ये नोंदले गेले. पहिला शॉर्ट कॉर्नर मिळताच रुपिंदरने गोलकीपरला चकवून गोल केला.बचावफळीतील हरमनप्रीतसिंगच्या उत्कृष्ट टॅकलिंगमुळे आॅस्ट्रेलिया संघाची चेंडूवरील पकड शिथिल झाली होती. त्याचा लाभ घेत सुमितने मनप्रीतसिंगच्या मदतीने दुसरा गोल नोंदविला. पुढच्या मिनिटाला आकाशदीपसिंग याने गोल नोंदविण्याची संधी निर्माण करताच, २१ वर्षांच्या सुमितने पुन्हा चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली.पहिल्या क्वार्टरमध्ये ३-० ने आघाडी घेणाºया भारतीय संघाच्या आत्मविश्वासात भर पडलेली जाणवली. हरमनप्रीतने बचावाची बाजू भक्कमपणे सांभाळली. अनेकदा त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून चेंडूवर नियंत्रण मिळविले होते. भारतीय संघ पुढील सामना सोमवारी खेळणार आहे. (वृत्तसंस्था)‘पुढील सामना कठीण असेल. पण आम्ही सज्ज आहोत. आॅस्ट्रेलियाच्या राष्टÑीय संघातील सात खेळाडू अ संघात होते. तरीही आम्ही एकतर्फी विजय नोंदविल्याने आजच्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास बळावला आहे. ही माझ्या मते चांगली प्रगती म्हणावी लागेल.’- ग्रॅहम रीड, मुख्य प्रशिक्षक भारत.

टॅग्स :Hockeyहॉकी