तौरंगा (न्यूझीलंड) : तब्बल चार पेनल्टी कॉर्नरची संधी वाया घालविणाºया भारतीय पुरुष हॉकी संघाला चार देशांच्या हॉकी मालिकेत गुरुवारी बेल्जियमकडून ०-२ असा पराभवाचा धक्का बसला.बेल्जियमकडून सॅबेस्टियन डोकियर (८ वा मिनिट)आणि व्हिक्टर व्हेग्नेज (३४ वे मिनिट) यांनी गोल केले. उभय संघांनी पहिल्या क्वार्टरमध्ये रोमहर्षक खेळ केला; पण बेल्जियमच्या आक्रमक फळीने वारंवार भारतीय बचावफळीची परीक्षा घेतली. बेल्जियमला चौथ्या मिनिटाला संधी होती; पण गोलकिपर श्रीजेशने हा हल्ला थोपविला. चार मिनिटानंतर डोकियरने रिव्हर्स स्विपवर श्रीजेशला चकवून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसºया क्वार्टरमध्ये बेल्जियमच्या बचावफळीने भारतीय खेळाडूंना रोखून धरले. युवा खेळाडू अरमान, विवेकप्रसाद आणि मनदीप यांनी मात्र वारंवार हल्ले चढविले. काही मिनिटांनतर रमणदीपसिंग याने बेल्जियमच्या डीमध्ये प्रवेश केला. पण त्याचा पास उंचावर असल्याने क्रॉसबारच्या वरून निघून गेला. मध्यंतरापर्यंत बेल्जियमकडे १-० अशी आघाडी होती. तिसºया क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला भारताला पेनल्टीकॉर्नर मिळाला. वरुण कुमारची ड्रॅगफ्लिक मात्र वाया गेली. ३४ व्या मिनिटाला व्हिक्टरने दुसरा गोल नोंदविताच बेल्जियमच्या गोटात आनंद संचारला. भारतीय खेळाडूंचा संघर्ष अखेरपर्यंत सुरू होता; पणखाते उघडण्यात त्यांना यशआले नाही. भारताला तिसरा सामना शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)
भारताचा ०-२ गोलने बेल्जियमकडून पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 2:38 AM